चंद्रभागा नदी पात्रातून अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर ताब्यात… — खल्लार पोलिसांची धडक कारवाई… — खल्लार ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

            खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील चंद्रभागा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी विना परवाना अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांनी 24 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास पकडला असून रेती तस्करी करणाऱ्या आरोपीविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध रेती करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. खल्लार पोलिस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र बारड यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दानाणले आहेत.

             खल्लार ठाण्याच्या हद्दीत दि. 24 फेब्रुवारीला रात्री 3:15 वाजता ठाणेदार रविंद्र बारड यांच्या मार्गदर्शनात सपोउनी पंजाबराव चौरपगार हे सांग सहका-यांसह पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना रामगाव जवळील राधास्वामी सत्संगजवळ दर्यापूर येथिल इमरान शा मन्नान शा वय 23 वर्ष, रा दर्यापूर हा ट्रॅक्टर क्रं MH 27,DA 4638 व विना नंबरची ट्रॉली रेतीची अवैध वाहतूक करतांना आढळली.

           सपोउनी पंजाबराव चौरपगार यांनी अवैध रेती तस्करी करणारा करीत असलेला ट्रॅक्टर,ट्रॉली व रेती असा एकुण 4,54 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेउन जप्त केला व आरोपी इमरान शा, मन्नान शा विरुध्द कलम 303(2)बी एन एस नुसार गुन्हा दाखल केला आहे.