
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज १९ फेब्रुवारी तथा राष्ट्रसंत गाडगेबाबा २३ फेब्रुवारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व विकास समिती व मित्रपरीवार सावली यांच्यावतीने ग्रामीण रुग्नालयातील रुग्णांना फळे व बिस्कीट व मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले.
यावेळी पर्यावरण संवर्धन व विकास समिती सावलीचे कार्याध्यक्ष प्रशांत तावाडे,युवा सामाजिक कार्यकर्ते कमलेश गेडाम, सामाजिक कार्यकर्त्या लताताई वदलकोंडावार,डॉ.महेंद्र मेश्राम,परिचारिका दीपलक्ष्मी ठोकाडे,विद्या ढोले,कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याची स्थापन करून जनतेचे सुराज्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे, मुर्तीपुजा, अंधश्रद्धा, व्यसन याला विरोध करणारे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, यासानी धर्म शाळा, वस्तीगृह निर्माण केले.
मुंबई सारख्या शहरात शाळा सुरू करणारे विज्ञान वादी, समाजसुधारक स्वच्छतेसाठी हातात झाडु घेऊन स्वच्छता मुलमंत्र देणारे महान संतसुधारक गाडेबाबा व छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांना रुग्णाना फळे व बिस्कीट वाटप करुन अभिवादन करण्यात आले व लहान मुलांना खाऊचे वाटप पार पडले.
सदर संघटनेचे कार्य नेहमीच कौतुकास्पद असून संघटनेचे अध्यक्ष प्रशांत तावाड़े यांचे कौतुक केले जात आहे.