ब्रेकिंग न्यूज… –विहीर बांधकाम करताना दरड कोसळून मजुराचा मृत्यू… — पंनेमारा येथील घटना…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

         मुरूमगाव येथून ३ कि.मी. अंतरावरील पनेमारा शेतशिवारातील विहीर बांधकाम करताना मातीची दरड कोसळल्याने वसंत बुधेसिंग फाफामारिया ( 38) यांचा मृत्यू झाला.

         याबाबत सविस्तर असे की पन्नेमारा येथील लछचन तुलावी यांच्या शेतात महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीचे बांधकाम करताना खोदलेल्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम सुरू असताना अचानक वरच्या बाजूने मातीची दरड कोसळली, त्यामुळे बांधकाम करीत असलेल्या तीन मजुरांपैकी वसंतच्या कपाळावर काँक्रीटचा मार लागला आणि वरून मातीचा ढिगारा कोसळल्याने तो मांडीपर्यंत विहिरीच्या आत दबल्या गेला.

          त्याच्या बाजूला असलेले दोन मजूर सामू मालिया व संदीप पोयाम यांनी लगेच पावड्याने माती ओढून त्याला बाहेर काढले असता वसंत हा पूर्णता बेशुद्ध अवस्थेत आढळला. विहिरीच्या काठावर असलेल्या मजुराच्या साह्याने त्याला वर काढण्यात आले आणि तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टर राहुल बनसोड यांनी वसंतला मृत घोषित केले व पोलीस विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिस उतरिया तपासणी करिता शव विच्छेदना साठी धानोरा येथे पाठविण्यात आले.

          मृत पावलेल्या वसंत फाफामारिया या मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

      MRGS चे प. स.अभियंता खरकाटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कोट

ठेकेदार राजिक खान,

          मी शेतकऱ्याच्या विहिरीचे बांधकाम साहित्य पुरवठादार असून सदर योजना बाबतचे सर्व एग्रिमेंट शेतकऱ्यांशी करण्यात येते, कामावर मजूर बोलावणे, त्यांची मजुरी देणं ही सगळे व्यवहार प्रत्यक्ष शेतकरी करतो. मी फक्त जेसीबी ने विहीर खोदणे व साहित्य पुरविणे हे काम शेतकऱ्याच्या मागणीनुसार करीत असल्याचे सांगितले.

      विहीर बांधकामात मृत्युमुखी पडलेल्या मजुराकडे MRGS योजनेचे जॉब कार्ड असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी अशा मोठ्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी केली आहे.