
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करून आज सकाळी चिमूर शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत बाळ शिवाजीचा पाळणा अफजलखानाचा वध शिवराज्य अभिषेक यावर झाकी सादर करीत “जय जिजाऊ जय शिवराय”च्या घोषणा देत रॅली चिमूर शहरातील डोंगरवार चौक, नेहरू चौक, मासळ चौक, हजारे मोहला, चावडी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक करीत परत शाळेत येऊन पोहोचली.
दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोरकर सर, मिलमिले सर, गोमात्रे सर,वाघधरे सर, बोरकर सर, पाटील सर,मेश्राम सर, पराते सर, बावणे सर, दधंये सर,कामडी सर, दांडेकर सर, मेश्राम सर,यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.