
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- एल आय सी चौकातील दुकान लाईन च्या भागात नुकतेच अंदाजित ३ महिन्या अगोदर बांधकाम विभागाकडून बांधकामाचे, पार्किंग शेड, घटू लावणे आणि नाली बांधकाम इत्यादी कामे झाली आहेत. सर्व कामाच्या दर्जाचा विचार करता अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे व तीन महिन्याच्या आकालावधीतच बराच भाग हा मोडकळीस येत आहे व नासधूस होत आहे. या भागात बांधलेले नाली आणि त्यावरील बसविलेल्या लोखंडी आवरण जाळी तुटून चालले आहे. सदर नाल्यांवरील जाळ्या तुटून तकलादू झाल्यामुळे यावरून जाणारे दुचाकीस्वार, पायिंचालणारे याना दुखापत होण्याची व जीविताला देखील धोका आहे. यामध्ये अधिकारी काय झोपेत असतात काय असा सवाल राज बन्सोड यांनी उपस्थित करत, भविष्यात कुठलीही अपघाताची घटना घडल्यास कार्यालय आणि संबंधित अभियंता जबाबदार राहणार आहे असेही म्हटले आहे.
सदर तीन महिन्या अगोदर पूर्ण झालेल्या या कमावरती मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे असे ऐकण्यात आहे व काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे या कामाची निष्पक्षपाने चौकशी होणे आवश्यक आहे. या गंभीर बाबीकडे आपण त्वरित लक्ष घालून तकलादू नालीच्या अवस्थेमुळे होणाऱ्या संभावित धोका टाळण्यासंबंधी कार्यवाही करावी आणि जर सदर बाब दुर्लक्षित करण्यात आली आणि योग्य ती कार्यवाही न झाल्यास आझाद समाज पक्षाकडून या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.