श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- तालुक्यातील सोनार समाज संघटीत व्हावा व आपआपसात स्नेह, प्रेम, सहानुभुती, आत्मीयता व एक संघतेची भावना वृध्दींगत व्हावी या हेतुने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय सोनार समाज मंडळ देसाईगंज द्वारा समाज बांधवाचे स्नेहमिलन व सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ ला करण्यात आले होते.

           कार्यक्रमाचे उद् घाटन आ. रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून जि.प.चे माजी क्रुषी सभापती नाना नाकाडे, मंचावर सोनार समाज मंडळ देसाईगंज तालुका अध्यक्ष पंढरी कावळे, उपाध्यक्ष विजय कावळे, सचिव प्रेमदास बांगरे सह अन्य पदाधिकारी व जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

          कार्यक्रमाची सुरुवात घटस्थापना व श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

           दरम्यान सकाळी 9 वा. शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करून कार्यक्रम स्थळापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. तदनंतर पाहुण्यांचे आगमन, दिप प्रज्वलन, स्वागत, सत्कार मार्गदर्शन करण्यात आले. दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त (75 वर्षवरिल) व शासकीय/निमशासकीय नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा 10 वी, 12 वी तील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर भजन, गोपालकाला व महाप्रदाचे वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

       कार्यक्रम यशस्वीते करीता नितेश हाडगे, महेश भरणे, प्रतिकुल गजपुरे, प्रमोद बेहरे, दुर्गेश पोवळे,भरत मस्के, ज्ञानेश्वर बेहरे, सारंग बेहरे, विशाल कावळे, स्वप्नील हर्षे, नितिन डोमळे, निळोबा येवले, विशाल मस्के, लोकेश ढोमने, रोशन बागरे, मंगेश भरणे, किशोर भरणे, प्रमोद करंडे, गौरव भरने, शुभम कुंभलवार, सुरेंद्र घुले, विद्याधर बेहरे, गजेंद्र काळबांधे, आकाश पोवळे तसेच महिला मंडळ पदाधिकारी आदींनी अथक परिश्रम घेतले. 

        कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंढरी कावळे यांनी केले. संचालन श्री भरणे गुरुजी तर आभार प्रदर्शन विजय कावळे यांनी केले. कार्यक्रमाला समाजातील सर्व महिला/पुरुष व बाल गोपाल मोठ्या संखेने उपस्थित होते.