![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस,उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सण 2025 अखेर क्षय मुक्त भारत करण्यासाठी 100 दिवसिय अभियान मोहीम डॉ.सागर जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र साखरा (पौड)येथे निक्षय शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात टि.बी.चॅम्पियन्स म्हणून श्री.गणेश दादाजी आत्राम यांनी उपसिथत नागरिकांना क्षयरोगाविषयी माहिती दिली.दोन आठवड्या पेक्षा जास्त काळ असलेला खोकला हा टि.बी. लक्षणात येवू शकतो,वजनात लक्षणीय घट,रात्री येणारा हलकासा ताप,भुक मंदावणे,बेडक्यातुन रक्त पडणे,मानेवर गाठी येणे ईत्यादी लक्षणे आसल्यास आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन बेडक्याची मोफत तपासणी करून यावी.
तसेच छातीचा फोटो ( X-ray) मोफत काढून घ्यावे आणि क्षयरोगाचे निदान लावून घ्यावे आसे आव्हान श्री.गणेश आत्राम यांनी केले. यावेळी टि.बी.चॅम्पियन गणेश आत्राम यांचा शाल – श्रीफळ देऊन सत्कार विजय पाटील धोंडगे तालुका क्षयरोग प्रवेक्षक आणि गणेश शिंदे आरोग्य कर्मचारी यांनी केले.
या शिबिराचे आयोजन अंजना टेकाम,ताराबाई दुरगे,पपिता चिडे यांनी केले होते. सदर शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समिर थेरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.