
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ताडोबा व्याघ्र प्रकल्प जंगल लगत अनेक गाव असल्याने गावातील जनावरे गुराखी जंगलात चरायला घेवून जातो.यात जंगलाचा राजा व गुराखी (मानव ) असा संघर्ष अनेकदा ऐकायला मिळतो.
अशीच घटना नुकतीच पळसगाव ( बफर ) वनपरिक्षेत्रात घडली,यात वाघा समोर गुराख्याला आपला जिव गमवावा लागला.
पुन्हा ह्या घटना वारंवार वनपरिक्षेत्रात होवू नये यासाठी पळसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगीता आत्राम यांच्या संकल्पनेतून गुराखी – वाघ संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग वनपरिक्षेत्रात येनाऱ्या गावातील गावठाण जागेवर गुरांचा गोठा स्वच्छ बांधून जनावरांचा सांभाळ करणार आहेत.
ब्रम्हपूरी विभागा अंतर्गत येत असलेल्या पळसगाव वन परिक्षेत्रात २५ जानेवारीला विहीरगाव येथील गुराखी दयाराम गोंडाणे हे गावातील जनावरे जंगलात चरायला घेवून जात असताना वाघाने त्याच्यावर हल्ला चढवीला असता त्याचा मृत्यु झाला.अशा दोन घटना वनपरिक्षेत्रात घडल्या यात त्यांचा मृत्यू झाला.
याचा धसका पळसगाव वन विभागाने घेतला असून गुराखी – वाघ संघर्ष टाळता येईल व शासनाच्या तिजोरी वरील खर्च थोडाफार कमी होईल यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी योगीता आत्राम यांनी वनपरिक्षेत्रातील पारणा,पिपर्डा,कारवा,पळसगाव,विहीरगाव,मदनापूर,बेलारा,गोंड मोहाडी,देवरी,करबडा, चैती (तू) व मासळ अशा बारा गावातील ग्रामपंचायतला नोटीस बजावली आहे.
या विषयी गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया ग्राम सभेत घेवून ठराव मंजूर केल्या नंतरच ग्रामपंचायतच्या गावठाण जागेवर गुरांचा गोठा बांधून सांभाळ करण्याचा निर्णय वनविभाग घेणार आहे.
ताडोबाच्या जंगलात जनावरे चराईसाठी बंदी आहे,तरी ताडोबांचे जंगल गावाला लागून असल्यामुळे जनावरांना हिरवा चारा मिळावा यासाठी जनावरे चराईसाठी गुराखी जंगलात जनावरांना नेतात.यात दबा धरून बसलेल्या वाघाने अनेक जनावर व गुराख्याचे जिव घेतले.
यावर आळा बसावा मानव आणि वाघ सुरक्षीत राहवे यासाठी प्रायोगीक तत्वावर वनविभाग ईडीसी मार्फत प्रथम मदनापूर येथे गुरांचा गोठा बांधून जनावरांना सर्व सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहे.
हा जनावरांचा गोठा यशस्वी झाला तरच बाकी अकरा गांवात गुरांचा गोठा बांधनार आहे.
******
बाॅक्स….
वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गांवांना या विषयी नोटीस बजाविण्यात आली आहे. जनावर मालक व ग्रामस्तानी ग्रामसभेत ठराव मंजूर केल्यानंतरच गुरांचा गोठा गावठाण जागेवर बांधन्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
प्रथम प्रायोगिक तत्वावर मदनापूर येथे गुरांचा गोठा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.
योगीता आत्राम
वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगाव (पिपर्डा)
******
बाॅक्स….
गावातील जनावरे भैस, गाय, बैल व वासरू कालवड पाहुन गोठा तयार करण्यात येईल हि जनावरे याच गोठ्यात नेहमीसाठी राहील.पाहिजे तेव्हा जनावर मालकांना आपली जनावरे त्या गोठ्यातून इतर कामासाठी नेवून परत त्याच गोठ्यात आनून ठेवता येईल. जनावरांची देखभाल,चारा,पाणी व आरोग्य यांची पूर्ण व्यवस्था वन विभाग करेल यासाठी दोन वनकर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.
योगीता आत्राम
वनपरिक्षेत्राधिकारी
पळसगाव (पिपर्डा)
तालुका चिमूर,जिल्हा चंद्रपूर…
*******
बाॅक्स
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) वनपरिक्षेत्रातंर्गत गावठाण जागेवर विशेष गोठे बांधून १२ गावातील जनावरांना एकाच जागी ठेवण्याचा व त्यांची देखभाल करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असला तरी हा निर्णय पशु मालकांना आणि त्यांच्या जनावरांना दिलासा देणारा ठरणार काय?हा मोठा प्रश्न पुढे चालून आवासून उभा असणार आहे…
पशु मालक स्वतःच्या पशुंचे संवर्धन जिवापाड प्रेम करुन करतात.स्वत:च्या पशुवर दररोज मुलांसारखे लक्ष ठेवतात.वेळेवर चारा टाकतात आणि वेळेवर पाणी पाजतात.
शेतकऱ्यांच्या अंगणात किंवा गोठ्यात असलेले पशुधन त्यांच्या आयुष्याचा दैनंदिन भाग असते.यामुळे वनविभाग पशु मालकांसारखी पशुंची देखभाल करणार काय?या गंभीर मुद्दा सध्यातरी अनुत्तरित आहे…