
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूरात जगप्रसिध्द घोडा यात्रा दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत भरत असते. ही यात्रा प्रसिद्ध असून, चिमूरचा घोडा ब्रम्हपुरीचा वडा अशी म्हण प्रचलित आहे. या प्रसिध्द घोडायात्रेला सोमवार १० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून सलग सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षात सतत कुठल्या ना कुठल्या मंदिराच्या प्रतिकृतीचे हुबेहूब मंदिर बांबू पासुन बनवून भाविकांना दर्शन मिळत होते. मात्र यावर्षी काही आगळीवेगळी कृती करुन चिमूर क्रांती भूमीतील जगप्रसिद्ध घोडा यात्रेची महती जगाच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे यासाठी आमदार बंटी भांगडिया यांच्या संकल्पनेतून चिमूर घोडा यात्रा उत्सव समिती तर्फे सतत पाच दिवस भव्य दिव्य असा कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत यावर्षी रंगणार आहे.
आज रात्रौ इशरत जहाँ यांचा भव्य रोड शो निघणार आहे. श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा चिमूर निमित्त ‘चिमूर घोडा यात्रा महोत्सव’ २०२५ असा असणार असुन, आज सायंकाळी ७ वाजता भगवा रंग चढणे लगा फेम इशरत जहाँ यांचा रोड शो, १३ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय गरबा गायिका गीताबेन रब्बानी यांचा लाईव्ह कन्सर्ट शो, १५ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांचा लाईव्ह कन्सर्ट शो, १६ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता वैभव गुघे व सोम्या कांबळे यांच्या उपस्थितीत नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन आणी १७ फेब्रुवारी सायंकाळी ७वाजता आंतरराष्ट्रीय कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन असा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे.
सदर कार्यक्रमाला १५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रम पहिल्यांदाच भव्य दिव्य असा कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत होत असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी शांततेत मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी चिमूर विधानसभा क्षेत्रांतील नागरीकांना शांततेत कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आपलाच कार्यक्रम समजून सहकार्य करण्याचे आवाहन आमदार बंटी भांगडिया व चिमूर घोडा यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.