संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत (नेफडो )अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लवारी येथिल रहिवासी अनिल शिवलालजी किरणापूरे महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त यांची भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण व मानवता विकासाकरिता केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तसेच संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन समाज उपयोगी कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याची वरिष्ठ पदाधिकारी यांनी दखल घेऊन त्यांची नियुक्ती केलेली आहे.
अनिल किरणापूरे हे युवा शेतकरी असून त्यांना महाराष्ट्र शासनाने युवा शेतकरी पुरस्कारने सन्मानित केले आहे.
नेफडो अंतर्गत पर्यावरणस्नेही या नात्याने पर्यावरण संवर्धनाचे निस्वार्थ प्रामाणिक कार्य करत राहाल या अपेक्षेने आपली निवड करण्यात आल्याबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय मार्गदर्शक अण्णा हजारे, राष्ट्रीय सल्लागार लताश्री वडनेरे, राजेंद्र नागवडे, हरीविजय देशमुख, ब्रँड ॲम्बेसिडर सिनेअभिनेते जयराज नायर, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भवर,राष्ट्रीय सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले,महाराष्ट्र युवा अध्यक्ष बबलू चव्हाण ,नागपूर विभागीय अध्यक्ष विजय जांभुळकर ,विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर ,विभागीय सचिव पंडित काळे ,आदीसह नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सभासदांनी अभिनंदन केले आहे.
नेफडो या संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील गरजूना मदत केली जाते. पर्यावरण संवर्धना सोबतच मानवता विकासाचे कार्य या संस्थेमार्फत होत असून संपूर्ण महाराष्ट्रसह, भारत व बाहेर देशातही या संस्थेचे सभासद असून तिथे उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात.
राबवलेले विशेष उपक्रम स्वतःच्या शेतावर दीड एकर क्षेत्रामध्ये तायवाण पिंक पेरू लागवड करून फळबाग शेतीच भविष्यात शेतकऱ्यांना मोठं करेल.