सत्यशोधक पद्धतीने पार पडला विवाह सोहळा… — महापुरुषांच्या विचारांचे गितातुन प्रबोधन… — सर्वत्र विवाह सोहळ्याची चर्चा…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

        चिमूर तालुक्यातील गोंडमोहाळी गावात प्रथम सत्यशोधक मुलीचा विवाह सोहळा पार पडला. महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यधर्माचा प्रसार जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे.

         चिमूर तालुक्यातील गोंडमोहाळी येथील देविदास महाडोरे यांची जेष्ठ कन्या आचल हिचे मु.पो अड्याळ ता. पवनी जि.भंडारा विजय मोहुर्ले यांचे चिरंजीव चेतन यांचेशी दि ०४ |०२ | २०२५ रोज मंगळवारला गोंडमोहाळी ता.चिमूर येथे सत्यशोधक पध्दतीने विवाह सोहळा पार पडला.

          त्यामध्ये सर्वप्रथम महात्मा फुले,सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रवज्लन करुन वधु वराचा व आईवडीलाचा परीचय करुन देण्यात आला.सत्यशोधक विवाहाबद्ल सत्यशोधक विधी मोहुर्ले यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले.

         वधूवराच्या हातात हार देवून महात्मा फुले रचित मगलाष्टके म्हणण्यात आले मगलाष्टके नंतर वराडी पाहुण्यांना साक्षी ठेवून वधूवरांना शपथ देण्यात आली.

         या सत्यशोधक विवाह संस्कार उपस्थीत सत्यशोधक विधीकर्ते माळी समाजातील गुरनुले, मोहुर्ले,शेंडे,बोरुले,निकोडे,महाडोरे यांनी विधी गायली. सत्यशोधक विवाह पहिल्यांदाच तालुक्यात पार पडल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.