शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर बस स्थानक प्रमुख श्री वैभव धाडसे व सूरज मुन यांची बस स्थानक परिसरातील नियमबाह्य आस्थापना, नियमापेक्षा जास्त अतिक्रमन, परवानगी नसलेले व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मदत करणे,बाजार भरू देणे,तसेच सन्याक बार आस्थापना धारकांस मदत करीत असून उपहारगृह चालवण्याची परवानगी असल्यासारखे वडे, भजे, आलूबोन्डे, समोसे, पुरिभाजी, पोहे यासारखे खाद्य खुले विकत असून ग्राहकांना बसण्यासाठी टेबल, नासत्यासाठी स्टील प्लेटा, खुला पाणी, चणा रस्सा, ठेऊन विक्री करीत आहे.
बस स्थानकाचे दर्शनी भागातील भिंतीवर अतिक्रमन करण्यास मदत करणे, बस स्थानकातील थांबा, फ्लॅट क्र. 5,6,7 येथील प्रवाशी यांना बसण्याची व्यवस्था नाही.
तासंतास उभे रहावे लागत असून खुर्च्याची मागणी केली नाही. याबाबत मी प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी श्री धाडसे व मुन यांना सांगितले. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
थोर पुरुष यांचे तैलचित्र अतिक्रमन मुळे पूर्णपणे झाकले आहे. बस स्थानक समोर प्रायव्हेट वाहने अगदी गेटवर उभी करून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे बस ड्रायव्हर यांना बस बाहेर नेतांना व आत आणतांना कठीण झाले आहे. प्रायव्हेट वाहन गेटवर लावून प्रवाशी घेऊन जात असल्याने चिमूर बस आगाराचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे.
बस स्थानक प्रमुख स्वतःचे आर्थिक हीत साध्य करण्याकरिता हे सर्व परीने मदत करीत आहेत.या सर्व बाबीस बस स्थनाक प्रमुख श्री वैभव धाडसे व सूरज मुन हे जबाबदार आहेत. यांनी कर्तव्यात कसूर केला अधिकाराचा गैरवापर केलेला आहे त्यामुळे नीलंबणाची कारवाही करावी.