केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणाची सुनावणी १७ फेब्रुवारीला… — इतर प्रकरणाच्या सुनावण्या सुध्दा याच महिन्यात….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

     भारतात पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्हातंर्गत वरोरा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा व इतर पाच आरोपी यांच्या विरुद्ध विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी,जबाबदार व जागरूक नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक तथा RTI कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर यांनी अट्रासिटाच्या कलमानुसार फौजदारी खटला क्रमांक ०२/२०२५ नुसार दाखल केला आहे.त्यामध्ये सदर प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक १७/०२/२०२५ ठेवण्यात आलीं आहे.

*****

परभणी प्रकरण…

        याचबरोबर महाराष्ट्र राज्यांतर्गत परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सुर्यवंशी लाॅ चां विद्यार्थी हत्या प्रकरणात आरोपी अशोक घोरबांड ठाणेदारसह,इतर पाच आरोपी विरुद्ध अट्रासिटीचा फौजदारी खटला विनोदकुमार खोब्रागडे यांनी दाखल केला असून खटला नंबर ०३/२०२५ असुन सुनावणी १२/०२/२०२५ आहे.

*****

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजना भ्रष्टाचार प्रकरण…

      चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अन्वये मय्यत लाभार्थ्यांच्या नावाने २०१७ पासुन दिनांक १६/०१/२०२५ पर्यंत एक करोड अंशी लाखांची अफरातफर केल्यामुळे आरोपी जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी सह,तत्कालीन जिल्हाधिकारी,तिन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी राजुरा,पोलिस प्रशासन सह १३ आरोपी विरुद्ध कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात फौजदारी खटला विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक तथा RTI कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ कलम ३० नुसार आँनलाईन दाखल झाली आहे,रजिस्टर नंबर पडायचा आहे,सोमवारी पडणार आहे.

        मय्यत लाभार्थींच्या नावाने करोडो रुपये सन २०१७ पासून दिनांक १६/०१/२०२५ पर्यंत हडप करत लुटमार केली.या गंभीर भ्रष्टाचार प्रकरणात,”जनाची नाही तर मनाची थोडी लाज शरम संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाटली नाही,असे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक बोलू लागले आहेत…

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांना गंभीर रिपोर्ट देऊनही त्यांनी कुठलीही कारवाई आरोपी विरुद्ध केली नाही,म्हणूनच विनोदकुमार खोब्रागडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

*****

दिक्षाभुमी चंद्रपूर प्रकरण…

      दीक्षाभूमी चंद्रपूर भ्रष्टाचार प्रकरणात विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे विरुद्ध अरूण घोटेकर व इतर मध्ये कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयाने आदेश पारित केले असून,वरोरा पोलिस प्रशासनाने अजुनपर्यंत अहवाल सादर केला नाही..

       फौजदारी खटला क्रमांक २३३/२०२४ असुन पुढील सुनावणी दिनांक २८/०२/२०२५ ठेवन्यात आलीं आहे.

*****

नागपूर अंबाझरी प्रकरण…

       अंबाझरी नागपूर प्रकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून पाडल्यामुळे विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा व इतरांवर फौजदारी खटला ०३/२०२३ दाखल केला असून आजपर्यंत उत्तर दिले नाही.अंबाझरी प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक १२/०२/२०२५ आहे..

*****

अवैध मुरुम उत्खन….

      वरोरा रेल्वेचे ठेकेदार यांनी सरकारी जागेवर अवैध मरुमाचे उत्खनन केल्यामुळे महसूल अधिकारी यांनी फौजदारी कारवाई त्यांच्यावर केली नाही,म्हणून विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी आरोपी जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी सी सह,सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा वरोरा सह तहसीलदार वरोरा व पोलिस प्रशासन यांच्या विरुद्ध फौजदारी खटला कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा येथे दाखल केला असून खटला क्रमांक ३१२/२०२४ असुन पुढील सुनावणी दिनांक १०/०२/२०२५ आहे.

****

       विनोदकुमार खोब्रागडे यांच्या सारख्या एक जबाबदार व जागृत नागरिक,”भारतीय संविधानाच्या माध्यमातून काय करू शकतो व नागरिक यांचे कर्तव्य काय आहे हे त्यांनी आपल्या महत्त्वपूर्ण कर्तव्यातून दाखवून दिले आहे..

           मात्र,सदर सर्व प्रकरणाच्या सुनावणीकडे महाराष्ट्र राज्यासह देशातील नागरिकांचे लक्ष लागले असून प्रत्येक प्रकरणाच्या सुनावण्या परत पुढे ढकलण्यात येतील आणि तारीख पे तारीख असा कायदेशीर प्रकार घडू शकतो असाही नागरिकांना संसय आहे.

*****

समाजहितासाठी…

   देशहितासाठी,राष्ट्रबांधनीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे… धन्यवाद!

******

याचिका कर्ता…

संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी,जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक,प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर…

— ९८५०३८२४२६….

— ८३२९४२३२६१…