मौजा विहिरगाव येथील वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची घेतली आमदार किर्तीकुमार भांगडियांनी सांत्वनपर भेट… — वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दिला ९ लाख ५० हजारांचा चेक..

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

    शुभम गजभिये 

       विशेष प्रतिनिधी..

         चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी आज चिमूर तालुक्यातंर्गत मौजा विहिरगाव येथील वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेले शेतकरी स्व.दयाराम लक्ष्मण गोंडाणे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि शासन नियमानुसार सर्वोतोपरी मदत करण्‍याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

             त्यानुसार वनविभागाकडून गोंडाणे कुटुंबियांना एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत मंजूर झाली असून वनविभागाने आज आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या हस्ते स्व.दयाराम लक्ष्मण गोंडाणे यांच्या पत्नी श्रीमती.राशीवृद्धा दयाराम गोंडाणे यांना ९.५० लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान केला.

         यापूर्वी अंत्यविधीसाठी ५० हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली होती आणि उर्वरीत १५ लक्ष रुपये फीक्स डीपाझीट स्वरूपात देण्यात येतील असे सांगितले. 

         यापुढील मदतीची रक्‍कम गोंडाणे कुटुंबियांना लवकरात लवकर देण्याच्या सूचना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.