जे एस पी एम महाविद्यालयात युवा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवचे आयोजन…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

       श्री साईबाबा ग्रामविकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जिवनराव सिताराम पाटील मुनगटे महाविद्यालय धानोरा येथे 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत क्रीडा स्पर्धा व आणि वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सव महोत्सव अरण्यदीप आयोजित केला आहे.

          या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल यांच्या हस्ते आज करण्यात आले.

        4 व 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

         6आणि 7फेब्रुवारी ला सकाळी नऊ वाजता रांगोळी स्पर्धा दहा वाजता ग्रंथ प्रदर्शन व 11 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          या विविध कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा जगदीश रामराव पांडे यांचे हस्ते होणार आहे.

         या कार्यक्रमाला श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे अध्यक्ष श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली तसेच सौ.आशी आशिष रोहनकर कार्याध्यक्ष श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली, सौ.मीनल रीषी सहानी सचिव श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली,श्री.सौरभ रमेशचंद्र मुनघाटे सहसचिव श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली, श्रीमती पौर्णिमा सयाम नगराध्यक्ष नगरपंचायत धानोरा, डॉ. देवेंद्र एम.माटे प्राचार्य श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी हे उपस्थित राहणार आहे .

        सदर अरण्यदिप युवा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्राचार्य डॉ.उदय थूल यांचे मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.

        या महोत्सवात गीत गायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वकृत्व स्पर्धा ,थाळी सजावट स्पर्धा ,पालक व माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवी प्रदान समारंभ असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

        कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ संजय मुरकुटे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक गीताचंद्र भैसारे, माजी विद्यार्थी प्रमुख प्रा डॉ. पंढरी वाघ तथा सर्व वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वृंद यांचेद्वारा करण्यात येत आहे.

        सदर महोत्सवात विद्यार्थ्यांचे कला गुणांना प्रोत्साहन देणे हा दृष्टीकोन केंद्रस्थानी आहे..