पिण्याच्या दूषित पाण्यामुळे वॉर्ड क्रं 06 येथील नागरिक त्रस्त… — वॉर्ड क्रं 06 येथे नवीन पाईपलाईन टाकण्याची काँग्रेसची मागणी… 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस :- शहरातील वॉर्ड क्रं 06 येथील बहिरम बाबा नगर, साई नगर, लूंबिनी नगर, क्रिष्णा नगर, तेगीया नगर, तुकडोजी नगर येथे नळाचे पिण्याचे पाणी अगदी दूषित स्वरूपात येत असून या घाणेरड्या पाण्यामुळे नागरिकांना विविध स्वरूपाच्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागत आहे.

       याठिकाणी असलेली जुनी पाईपलाईन ही क्षमतेपेक्षा कमी दर्जाची असल्याने त्यातून वारंवार पाण्याची गळती होते व यामधून गटारीचे घाणेरडे पाणी नागरिकांच्या घरात पोहचत आहे.

           नगरपरिषदेचे कर्मचारी वारंवार या गळतीचा शोध घेण्यासाठी पाईपलाईन खोदून तो लिकेज शोधण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना तो लिकेज मिळत नाही उलट त्यांनी केलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना ही त्रास होत असतो आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना ही त्रास होतो मात्र समस्या जैसे थी तशीच राहते. या परिसरात उन्हाळ्यात नागरिकांच्या नळाला पाणीच येत नाही.

           नागरिकांना पाण्यासाठी वॉटर टँकरवर उपलब्ध रहावे लागते एकंदरीत या परिसरातील समस्यासाठी ग्रामपंचायत काळात टाकण्यात आलेली ही पाईपलाईन असून ही संपूर्ण पाईप लाईन बदलवीण्यात यावी व नवीन पाईपलाईन टाकावी याकरिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्ठमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना देण्यात आले.

           याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,मोसीम शेख,तालुका सचिव विशाल मादर,तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, कुमार रुद्रारप,सुनील पाटील, दिपक पेंदोर, अभिषेक सपडी, महेंद्र बाग,अंकुश सपाटे,व मोठ्या संख्येने उपस्थित होते.