शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
वणी :- आज दि.०२/०२/२०२५ ला वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना तसेच वनविभाग अधिकारी यांना निवेदन सादर.
कोलार पिंपरी,गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे आहे त्या झुडपात जंगली जनावरे माणसावर व पाळीव जनावरांवर हल्ले करीत आहे. या आधी सुध्दा एका इसमावर प्राणघातक हल्ला करून तो इसम मरण पावला,गावातील अनेक जनावरांवर सुध्दा हल्ला झाला आहे. गावात दहशत पसरली आहे तरी या परीसरातील वाघ,आस्वल,नीलगाय व इतर जनावरांची विल्हेवाट लावण्यात यावी अन्यता या परीसरातील नागरीकांना सोबत घेऊन तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देतेवेळी यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष श्री.टिकाराम कोंगरे, तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.घनश्याम भाऊ पावडे, राजाभाऊ पाथ्रडकर,प्रफुल्ल उपरे,दिलीप पिदुरकर, रविन्द्र होकम, निवृत्ती ठावरी,मोहन सातपुते,बंडु मालेकर, दिनेश पाऊणकर,धिरज भोयर,प्रेमनाथ मंगाम,सोनु पिदुरकर, गंगाधर परचाके,मधुकर सावे,उमेश चांदेकर,प्रमोद ठाकरे, गोवर्धन पिदुरकर,ज्ञानेश्वर बेलेकर,युवराज ठाकरे, इत्यादि नागरिक उपस्थित होते.