घुग्घूस बस स्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसविण्यात यावा… — काँग्रेसची नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याना निवेदनातून मागणी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस : शहरातील बस स्थानक परिसरातील प्रमुख चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हा असून या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने घुग्घूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली.

        शहरातील बस स्थानक परिसरातील छत्रपती चौकाला लागूनच लॉयड्स मेटल्स कंपनीने कंपनीचा मुख्य प्रवेशद्वार निर्माण केला आहे.

         यापरिसरातील अतिक्रमण हे नगरपरिषदेने हटविले होते त्यामुळे सदर जागा ही शासकीय असल्याचे सिद्ध झालेले आहे करीता याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी संपूर्ण शहर वासियांची मागणी असून शहरातील अनेक युवक स्वयंम प्रेरणेने शहरात स्वाक्षरी मोहीम राबवित आहे.

         महाराजांच्या पुतळ्याने शहरातील विद्यार्थी युवकांना अन्याय अत्याचार विरोधात लढा देण्याची प्रेरणा मिळेल आपला गौरवशाली इतिहास येणाऱ्या पिढीला कळेल तसेच महाराजाच्या पुतळा व परिसरातील सौंदर्यकरणामुळे शहाराला सुंदर असे स्वरूप प्राप्त होईल करीता याठिकाणी महाराजांचा पुतळा निर्माण करण्याची मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली.

        याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष दिलीप पिट्टलवार,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, मोसीम शेख,तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, शेखर तंगडपल्ली, सुनील पाटील, दिपक पेंदोर, कुमार रुद्रारप, निखिल पुनघंटी,अभिषेक सपडी,महेंद्र बाग, अंकुश सपाटे, साहिल आवळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.