श्री गुरुजी जीवन गौरव पुरस्काराने शुभम पसारकर सन्मानित…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या नवरगाव द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघचालक परमपूज्य श्री.गुरुजी यांच्या नावाने श्री.गुरुजी जीवनगौरव पुरस्कार समाज कार्यासाठी समर्पित भावनेने वाहून घेणाऱ्या सेवावृत्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

        दिव्य वंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांना दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय श्री.लक्ष्मण सिंह जी मरकाम साहेब भोपाळ आयएनएएस अपर सचिव मुख्यमंत्री मध्य प्रदेश अतिरिक्त टीआरडीआय भोपाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन प्रदान करण्यात आला व दिव्यवंदना आधार फाउंडेशनच्या बांधकामाकरिता११,०००/- रुपयाची जाहीर मदत करण्यात आली.  

         चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील रहिवासी असलेले श्री.शुभम राजूजी पसारकर हे गेल्या ७ वर्षापासून दिव्य वंदना आधार फाउंडेशन जामगाव (को.) येथे विविध भागातील आढळून येणारे रोडवरील बेघर, मतीमंद, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, मनोरुग्ण अशा २१ व्यक्तीचे पालन पोषन, औषधोपचार व समुपदेशन असे प्रेरणादायी कार्य निरपेक्ष भावनेने करीत आहेत.

        त्यांच्या या कामात त्यांच्या मातोश्री सुद्धा सहकार्य मदत करीत असतात. अशा या बेघर, मतीमंद, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, मनोरुग्ण यांना संपूर्ण पणे बरे करून त्यांना रोजगार देणे, त्यांना सक्षम बनविणे हे जीवनाचे ध्येय त्यांनी ठरविले आहे. 

         या कार्यक्रमाला पतसंस्थेचे श्री.किशोरजी महालक्ष्मे, अध्यक्ष, श्री.गोविंदजी बिसेन उपाध्यक्ष, समस्त संचालक मंडळ व सहसर व्यवस्थापक श्री.दत्ता जी बहादुरे तसेच परिसरातील व संस्थेच्या शाखा स्थानावरून बहुसंख्य श्रोत्यांची उपस्थिती होती.