रामदास ठुसे
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना व्हाव मिळावा व त्यांच्या कलेस हक्काचे रंगमंच उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिमूर तालुका प्रेस असोशिएशन च्या वतीने शालेय समूह नृत्य स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवारला सायंकाळी पार पडले. या कार्यक्रमात शहरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी थिरकले.
सभागृहातील शहीदांना श्रद्धांजली व महापुरुषांचे पुतळे आणि प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सुमूह नृत्य सांस्कृतीक स्पर्धा कार्यक्रमाचे उद्धघाटन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम व उपस्थित मान्यवरांनी केले.
दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, कार्यक्रमाचे सह उद्धघाटक पिएसआय दिप्ती मरकाम, प्रमुख अतिथी सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा भास्कर बावणकर, मुख्याध्यापक रामदास कामडी, भाजपा नेते रमेश कंचर्लावार, सुजित झुरमुरे, शेंडे , परिक्षक प्रियंका राऊत, प्रितम रोकडे आदी उपस्थित होते यांचा सत्कार चिमूर प्रेस असोशिएशनच्या वतीने करण्यात आला. या वर्षीचा चिमूर क्रांतीभूषण पुरस्कार धावपटू वैभव जगन्नाथ दांडेकर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
स्वां. सं. सै. तथा संपादक स्व. दा. ल. काळे गुरुजी स्मृती पुरस्कार श्रमिक पत्रकार संघ प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त अमोद गौरकर यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
दरम्यान पत्रकार जावेद पठाण यांचा कार्यक्रम काळात अपघात झाला असता यांना चिमूर प्रेस असोशिएशन कडून आर्थीक सहाय्य करण्यात आले.रा. तू. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी कार्यक्रम स्थळाला भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक राजकुमार चुनारकर, संचालन माजी प्राचार्य सुधिर पोहनकर व आभार इमरान कुरेशी यांनी केले. सांस्कृतीक कार्यक्रमाला भिसी, काग, तळोधी (ना) , सोनेगाव (बे) व चिमूर शहरातील शाळा, महाविद्यालय यांनी सहभाग दर्शविला होता. या सांस्कृतीक कार्यक्रमाला शहरातील देनगीदार व इतर मान्यवरांचे सहकार्य लाभले.
प्राथमिक गटातील प्रथम पारितोषिक पुरुषोत्तमदास बागला कॉन्वेंट चिमूर, व्दितीय जिल्हा परिषद प्राथमीक केंद्र शाळा (मुले) चिमूर व तृतीय बक्षीस जि प प्राथ.शाळा सोनेगाव (बे), माध्यमिक गटातील प्रथम पारितोषीक पुरुषोत्तमदास बागला कॉन्वेंट चिमूर, व्दितीय न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूर व तृतीय सेंट क्लारेट इंग्लीश मिडीयम स्कुल चिमूर, महाविद्यालयीन गट प्रथम पारितोषिक ग्रामगिता महाविद्यालय चिमूर, व्दितीय राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर व तृतीय पारितोषीक आशिश मोहरकर कला वानिज्य महाविद्यालय भिसी यांनी पटकावला असून प्रोत्साहन पुरस्कार जि प उच्च प्राथ. कन्या शाळा नं १ (मुली), जि प प्राथमिक शाळा काग व राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय वडाळा (पैकू) यांना देण्यात आला.