ग्रामपंचायत सोनपूरीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

साकोली :- तालुक्यातील सोनपुरी येथे दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे दिनांक ३० जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    हळदी-कुंकूवा मागील धारणा अशी आहे की प्रत्येक सुवासिनी ही साक्षात आदिशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना हळद-कुंकू लावताना त्यांच्या माध्यमातून देवीचे तत्त्व जागृत करतो. यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते.

       या सोहळ्यामध्ये सुवासिनींना वाण देणे, उखाणे, गाणी, खेळ आणि गोडधोड पदार्थांचा आनंद घेतात.हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे. या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, वाण लुटतात त्यामुळे त्यांची एकमेकींशी ओळख होते आणि स्नेह वाढतो.

      ग्रामपंचायत कार्यालय सोनपुरी आयोजीत ‘सौभाग्याचे लेणं’ हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

        यावेळी तिलोत्तमा कठाने पोलिस पाटील, मनिषा नागरीकर, डॉ.पाकमोडे,सौ.बोरकर(ए एन एम), वंदना टेंभुर्णे(बी.एल.ओ.),माधवी कठाने (आई.सी.आर.पी.),निशा ब्राह्मणकर,रिमा गेडाम,पदमा उके,वनीता उके,देवांगना गेडाम ग्रा.पं.सदस्या, वैशाली ब्राह्मणकर,लीना तरोणे यांच्यासह गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.