युवराज डोंगरे
उपसंपादक
टाटा नगर दर्यापूर येथिल संतोष शामरावजी सातरोटे वय (30) यांचे दि.14 डिसेंबर 24 रोजी ह्रदय विकारांचे झटक्याने आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांचे वडील शामरावजी सातरोटे जे आंधळे आहेत. आई आणि लहान भाऊ विकास सातरोटे हे दिव्यांग आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती एकदमच कमकुवत आहे. त्यांच्या घरी दर्यापूर,काटेपुर्णा, खल्लार येथिल भोई समाजातील समन्वयक मंडळीनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला घेतला असता त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
तरी भोई समाज विकास संस्थेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की भोई समाजातील सुज्ञ नागरिकांनी दिव्यांग परिवारास मदत करावी असे आवाहन समाजातील नागरिकांना केले आहे.