शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सावरगाव :- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी नोव्हेंबर २०२४ पासुन मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत विविध कार्यकारी संस्थेच्या मार्फत धान खरेदी केली होती.
त्यानुसार शेतकऱ्यांना पहिल्या हप्ता मिळाला मात्र तेव्हापासून दिड महिन्याचा कालावधी लोटुनसुदधा चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत धानाचे चुकारे द्यावे अशी मागणी हरित सेना सदस्य महेश गिरडकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे शेतकरी शेताच्या धान उत्पादकतेवर उपजिविका भागवत असतो असे असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने दिसून येत आहे.
त्यामुळे शासकीय धान खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे अशी मागणी महेश गिरडकर यांनी निवेदनातून केली आहे.