विधानसभा निवडणुकीत 05 वाजता नंतर 76 लाख मते कसे वाढले? :- राजुरेड्डी.. — निवडणूक आयोगाला निवेदनातून विचारणा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

      चंद्रपूर :- नुकताच देशभरात 25 जानेवारी रोजी निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आले.

            लोकशाहीवर मतदारांचा विश्वास असणे आवश्यक आहे मतदान प्रक्रियेत तरुणांची संख्या वाढावी व जनतेचा विश्वास अबाधित रहावा म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

          मात्र नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या निकालाने व निवडणुकीत झालेल्या भोंगळ कारभाराने मतदारांची निवडणुकीवरील विश्वास हा कमकुवत झाला असून निवडणुकीतील पारदर्शकपणे अबाधीत राखण्यास निवडणूक आयोग अपयशी झाला आहे.

         या अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवेदनातून खालील माहिती मागितली आहे.

         लोकसभा निवडणुकी नंतर सहा महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 50 लाख मतदार कसे वाढले?

         महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या दिवशी सांयकाळी 05 वाजताच्या नंतर अंधारात 76लाख मते कसे वाढले इतक्या रात्री उशिरा पर्यंत कुठल्या मतदान केंद्रावर मतदान झाले त्याची माहिती देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली आहे.