शिवणपायली येथे दोन दिवसीय धम्म मेळावा २ आणि ३ फेब्रुवारीला… — जगप्रसिद्ध महाथेरो भदंत शिलानंद,महाथेरो भदंत ज्ञानज्योती देणार धम्मदेशाना आणि मंगलमैत्री…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

   शुभम गजभिये 

     विशेष प्रतिनिधी 

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथे दोन दिवसीय धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म मेळाव्याला जगप्रसिद्ध महाथेरो भदंत शिलानंद,जगप्रसिद्ध महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्यासह भिख्खू संघ उपस्थित राहणार आहे.

          महाथेरो भदंत शिलानंद यांच्या अध्यक्षतेखाली धम्मदेशनेचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि मंगलमैत्री दिली जाणार आहे. 

        चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभुमी बहुउद्देशीय स्मारक मंडळ शिवणपायलीच्या वतीने दिनांक,२ व ३ फेब्रुवारीला दोन दिवसीय धम्म मेळावा, नागसेन वन येथे आयोजित करण्यात आला आहे.

       त्यात धम्म रॅली,ध्वजारोहन,बुद्धवदंना,धम्म क्रांतीचे पाच सुत्रे,बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मिती,या विषयाला अनुसरून मार्गदर्शन व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ.दिलीप पाटील अलिबाग हे असणार आहेत तर उद्घाटक लोकेश गजभिये नागपूर असणार आहेत.

        मुख्य अतिथी म्हणून विनोद खोब्रागडे वरोरा,प्रा.संजय बोधे वरोरा,प्रज्ञाताई राजुरवाडे समतादूत बार्टी पुणे,प्रभाकर पिसे चिमूर,चिमूरचे उपविभागीय अधिकारी व प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रीधर राजमाने,दी.के.निकुरे नायब तहसीलदार,पोलिस निरीक्षक संतोष बाकल,विजय डाबरे,एकनाथ गोंगले,समाजसेवक किशोर अंबादे,लोकमत प्रतिनिधी विकास खोब्रागडे,सरपंच राजू भानारकर,पोलिस पाटील महेंद्र डेकाटे,ग्रामसेवक लोकचंद्र भसारकर,यांची उपस्थिती राहणार आहे. 

      रात्रौला विकास राजा यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.

         ३ फेब्रुवारीला महास्थविर पुज्य भदंत शिलानंद,महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती व पुज्य भिख्खू संघ यांच्या द्वारे शिलग्रहणाबाबत धम्म वाणी प्रसारीत होणार आहे.

        पुज्य भदंत धम्मचेत्ती संघारामगिरी, ता.वरोरा,जि.चंद्रपूर,भदंत सोण(सोणी टेकडी वडसा),भिख्खू सोनुत्तर,भिख्खू धम्मवंश, भिख्खूनी इंदमुनी(उरवेला मेडिटेशन सेंटर बुद्धगया.)हे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.

         सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्तच्या दोन दिवसीय बौध्द धम्म परिषद व बौद्ध धम्म समारंभाची सांगता ३ फेब्रुवारीला होणार आहे.