शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
स्मार्ट मीटर धोरणाच्या विरोधात चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कडून महावितरणला काल शुक्रवारला निवेदन देण्यात आले.
ग्राहकाला सध्या वीज बिल भरण्यासाठी मुभा मिळते.परंतु स्मार्ट मिटर मुळे ग्राहकाला पहिले रु. २००० किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जे करावे लागेल.नंतर लाईट वापरावी लागेल.स्मार्ट मिटरचा बॅलन्स संपल्यावर घरातील लाईट आपोआप बंद होईल.त्यामुळे रात्री-अपरात्री रिचार्ज संपल्यास अंधारात बसण्याची वेळ येईल.सर्वसामान्य गरीब जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडेल असे वास्तव निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पहिलेच महागाईने वैतागलेलं जनतेला महावितरण मोठा झटका देत असल्याने व जनतेची गळचेपी करणारे सरकारचे हे धोरण असल्याने या धोरणाला मागे घेण्यात यावे,अन्यथा गरीब जनतेच्या खिशाला मोठ्या प्रमाणात खार लावणाऱ्या या निर्णयाचा विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन उभे केले जाईल असे चिमूर विधानसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन सादर करून स्पष्ट करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर राजकीय सत्ताधारी पक्षांना रसद पुरवणारे अडाणी व इतर तीन कंपन्या जनतेची आर्थिक लूट करून त्यातील रक्कम तीन महिने बिनव्याजी स्वरूपात वापरणार आणि एकीकडे ग्राहकांना प्रीपेड स्वरूपात विद्युत बिलाचे पैसे भरण्यास बंधनकारक करून महाराष्ट्राच्या जनतेचे आर्थिक शोषण करू पाहणाऱ्या या बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेचा आम्ही अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत त्याचा युवक काँग्रेसच्या वतीने विरोध करन्यात आला आहे.
सद्यस्थितीत सदर मीटर बसण्याचे काम सुरू केले गेले असून सुरुवातीचे काम पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.तरी सदर कामास तात्काळ स्थगिती देऊन ते बंद करण्यात यावे.अन्यथा आम्ही जनहितार्थ याबाबत आक्रमक आंदोलनात्मक भूमिका घेऊ,असा इशारा यावेळी युवक काँग्रेस विधानसभा चिमूर यांनी काँग्रेसच्या वतीने महावितरणला दिला आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत डवले,तालुकाध्यक्ष नागेंद्र चट्टे,सचिव अक्षय नागरीकर, जिल्हा महासचिव रोहन नन्नावरे,उपाध्यक्ष विलास मोहिणकर,NSUI अध्यक्ष श्रीकांत गेडाम,गणेश कोरेकार, मंगलदास तराळे,राकेश साटोने,राहुल पिसे,इशांत मामीडवार,अतिश भैसारे,अक्षय लांजेवार,गणेश दहीकर,अमित मेश्राम,आशिष डवले,श्रीकृष्ण राजूरकर आदींच्या उपस्थितीत उपविभाग महावितरण कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले.