बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
लुमेवाडी तालुका इंदापूर येथील नामांकित कुस्ती मल्ल सम्राट पैलवान कमाल इमाम जमादार यांचे दुःखद निधन झाले. निधना समयी वय वर्ष 75 होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून नातवंडे आसा मोठा परिवार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते राजकारण आणि समाज कार्यातील जवळचे सहकारी होते.
शुक्रवार दिनांक 31जानेवारी 2025 रोजी त्यांच्या वर सकाळी 10 वाजता दफनभूमी येथे अंत्यदर्शन घेऊन दफन करण्यात आले.
त्यांचा तिसरा(जियारात) रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता लुमेवाडी येथील कबरस्थान येथे होईल.
पैलवान कमाल जमादार हे सलग 2 वेळा भारतात ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून कुस्ती क्षेत्रातील स्पर्धा जिंकली तसेच महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून 4 वेळा कुस्तीमध्ये विजय मिळवला.राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले अल्हाज हाजी हाफिज फत्तेह मोहम्म जोतपुर बाबांच्या दर्ग्याचे संस्थापक अध्यक्षही होते.
लुमेवाडी गावचे सरपंच म्हणून 25 वर्षे गावचा कारभार केला ग्रामपंचायत सदस्य म्हणून 40 वर्षे कामकाज पाहिल्याची ओळख आहे इंदापूर खरेदी विक्री संघांचे संचालक म्हणून 20 वीस वर्ष सेवा केली तर निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा मान स्वतःच्या पत्नीला मिळवून दिलेला आहे.
लुमेवाडी वि. का. सेवा सोसायटी कडे चेअरमन म्हणून 35 वर्ष कामकाज पाहिले.
राजकारण आणि समाज कारणामध्ये प्रत्येक जाती धर्मातील समाजाला मदत करणारा अन्नदाता म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये ओळख होती.
अनेक मुला मुलींचे मोडलेले लग्न जोडण्यापासून ते गावातील वादविवाद कधीच होऊ दिलेला नाही. आसा कर्तव्यदक्ष, प्रामाणिकपणा, कुस्ती मल्ल सम्राट पैलवान कमाल जमादार आशी इंदापूर तालुक्यामध्ये ओळख होती.
त्यांच्या जाण्याने लुमेवाडी आणि पंचक्रोशीतील संपूर्ण भागामध्ये दुःखमय वातावरण झालेले आसून, समाजाचे व कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.