ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : मागील 10 वर्षात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे ओळखीचे पुरावे म्हणून उदयास आलेले आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी योजनांचा, सेवांचा लाभ घेणेकरिता आधार कार्ड हे महत्वपूर्ण दस्तावेज आहे. आपली आधार माहीत अधिक बळकट करणे करिता प्रत्येक नागरिकाने आधार कार्ड दर ५ ते १० वर्षानी अध्यवत करणे अनिवार्य आहे.
अशातच बायोमेट्रिक समस्येमुळे ज्या नागरिकांचे आधार कार्ड अध्यवत होत नाही किंवा नवीन आधार नोंदणी होत नाही अश्या नागरिकांकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक ३१.०१.२०२५ रोजी यू.आय.डी.ए.आय, प्रादेशिक कार्यालय मुंबई मार्फत व्हाईट लिस्ट आधार नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर मध्ये एकूण २४ नागरिकांचे व्हाईट लिस्ट आधार नोंदणी व अध्यवतीकरण करण्यात आले.
सदर शिबीर करिता यू.आय.डी.ए.आय, प्रादेशिक कार्यालय मुंबई येथील सहाय्यक व्यवस्थापक विनय नागदिवे, तसेच जिल्हा आधार प्रकल्पाचे वरिष्ठ सहायक अभियंता राहुल बावणे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सुनील मोकडे, आधार ऑपरेटर धिरज काटवे उपस्थित होते.
“बायोमेट्रिक समस्येमुळे ज्या नागरिकांचे आधार कार्ड अध्यवत होत नाही किंवा नवीन आधार नोंदणी होत नाही अश्या नागरिकांनी यू.आय.डी.ए. आय हेल्प लाइन क्रमांक 1947 वर तक्रार नोंदवावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संपर्क करावे – राहुल बावणे, वरिष्ठ सहायक अभियंता, आधार प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली”.