ऋषी साहारे
संपादक
नागपूर :- जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन यांना मानवंदना देणे साठी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित 85 व्या मेळाव्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा ने अंनिस चे कार्यक्रम सादर करुन जबरदस्त जनजागृती केली.
सर्वप्रथम महा.अंनिसचच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांच्या नेतृत्वात समाधीस्थळापर्यंत जयघोष करीत शिस्तबद्ध मार्च काढला व जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन यांच्या समाधी ला माल्यार्पण केले. तसेच दादासाहेब ना.ह कुंभारे, पु.महास्थविर भन्ते धिरधम्म, माजी महापौर सखारामपंत मेश्राम यांच्या समाधी स्थळाला ही माल्यार्पण करुन जयभीम सलामी दिली.
तद्नंतर नदीपात्र मेळाव्यात रितसर कार्यक्रमाला सुरुवात झाली. संविधानाची उद्धेशीकेचे सामुहिक वाचन शोभा तिरपुडे यांनी तर कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे उद्दिष्ट्यें समजावून सांगितले. प्रा.पुष्पा घोडके यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा या मधील फरक विषद केला.
कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी देवानंद बडगे यांनी पाण्याने दिवा पेटविला व उपस्थित जनसमुदायाने आश्चर्याचे सुस्कारे सोडले. नंतर त्यांनी चमत्काराचे इतर प्रयोग सादर करुन लोकांना गुंतवून ठेवले. चळवळीचे गीत मंगला गाणार, इंदू उमरे ,अजय रहाटे, चंद्रशेखर मेश्राम यांनी सादर केले. चित्तरंजन चौरे यांनी “चालता बोलता संविधान” या कार्यक्रमात संविधानावर प्रश्न विचारुन विजेत्यांना पुस्तकें बक्षीस दिली.
या प्रसंगी “जागृती संविधान की” हे लोकप्रिय नाटक प्रस्तुत करण्यात आले. कलाकार होते अजय रहाटे, गौतम मघाडे ,वर्षा सहारे, देवानंद बडगे, निक्की बोंदाडे, चंदा मोटघरे, रंजना ठवरे व प्रिया कार्यक्रमाला रा.का.सदस्य रामभाऊ डोंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.’भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे’, या समापण गीता ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुंदर चित्रिकरण प्रिया गजभिए यांनी केले.सुत्रसंचालन चित्तरंजन चौरे यांनी तर आभार चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला नरेश महाजन, शांताराम उके,अर्चना राडे , माधुरी उके,कल्याणी डोंगरे, शारदा मोटघरे, सुधिर हाडके, एस मेश्राम,शशिकला वाघमारे, विणा ऊके,सुशीला जनबादे, एस एन मेश्राम,रत्नमाला जांभूळकर व मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.