ब्रम्हपूरी येथील इंदिरा गांधी चौक सौंदर्यीकरणाचे लोकार्पण… — माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राची धूरा हाती घेताच राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनस्तरावरून कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणत विकासकामांचा धडाका कायम ठेवत शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या ब्रम्हपूरी शहरात विविध शासकीय कार्यालयाच्या प्रशस्त इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून आता शहरातील वर्दळीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकाच्या सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

                 ब्रम्हपूरी शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालयाच्या समोरील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकाचे वैशिष्ट्यपुर्ण योजनेच्या ३६ लाख रुपयांच्या निधीतून सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सदर काम हे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतुन मंजूर झाले होते. सदर विकासकाम पुर्णत्वास आल्याने त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.

                 यावेळी बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ब्रम्हपूरी शहरातील इतरही मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येणार असुन यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. विकसित, समृध्द व सुंदर शहर म्हणून ब्रम्हपूरीचे नावलौकिक व्हावे यासाठी मी कुठल्याही प्रकारची कसर सोडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

               लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी नगराध्यक्षा रिताताई उराडे, माजी नगरसेवक महेश भर्रे, माजी नगरसेवक सागर आमले, मनोज कावळे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, कृउबा संचालक किशोर राऊत, तहसीलदार सतीश मासाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, मुख्याधिकारी अर्शिया जुही, स्थापत्य अभियंता अविनाश बंडावार, कार्यालय अधिक्षक मंगेश बोंद्रे, ईकबाल जेसानी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.