नेरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संजय येलमुले सेवानिवृत्त… 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        चिमुर तालुक्यातील नेरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सखाराम येलमुले हे दि. ३१ जानेवारी २०२५ ला सेवानिवृत्त झाले.

      १२-१०-२०१८ ला नेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून रुजू झालेत यापुर्वी ते सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे कार्यरत होते. 

         नेरी येथे सहा वर्षे पर्यंत पशुधन मालकांच्या जनावरांना डॉ.येलमुले यांनी चांगली सेवा दिली ते मनमिळाऊ स्वभावाचे व सर्वांचे चाहते होते.

         त्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात ३७ वर्षाचा सेवा काळ पुर्ण केला आहे.