जिल्हा परिषद शाळांकडे स्थानिक प्रशासनाचे दूर्लक्ष :- योगराज मुंगमोडे… — जिल्हा परिषद प्राथ.शाळा साकोली क्र.२ चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- शासकीय जिल्हा परिषद शाळांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असून अत्यंत उच्च शिक्षण देणाऱ्या जि. प. शाळांकडे नगरपरिषदेने तातडीने लक्ष द्यावे असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगराज मुंगमोडे यांनी ( शुक्र. ३१ जाने. ला ) दोन दिवसीय स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण समारंभात केले. पंचशील वार्डात ३० व ३१ जाने. ला या वार्षिक स्नेहसंमेलनाचा रंगारंग कार्यक्रमांनी शानदार समारोप झाला. 

         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ पंचशील वार्ड येथे ता. ३० वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटनात अतिथी जि. प. स. वनिता डोये, न. प. प्रशासकीय अधिकारी कल्याणी भंवरे, केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, जि. प. हायस्कूलचे प्राचार्य धर्मेंद्र कोचे आदी हजर होते. येथे दोन्ही दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळोत्तेजक स्पर्धा घेण्यात आल्या.

          शुक्र. ता ३१ ला समारोप बक्षीस वितरण प्रसंगी केंद्र प्रमुख पिंडकेपार बी. जी. भुते, शाळा व्यव.अध्यक्ष योगराज मुंगमोडे, उपाध्यक्ष प्रमिला बावणे, माता पालक अध्यक्षा प्रिया बडोले, शिक्षक पालक लक्ष्मीकांत वालदे, जि. प. क्र. १ मुख्या. डी. डी. वलथरे, मुख्या. बोदरा व्ही. डी. बुरडे, रवि भोंगाणे, आशिष चेडगे, से. नि. शिक्षिका लता बडोले, शोभा डोंगरे, वर्षा कांबळे हे हजर होते.

           यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगराज मुंगमोडे यांनी भाषणात सांगितले की, स्थानिक नगरपरिषदेला सर्वात जूनी जि. प. क्र. २ ही शाळा कुठे आहे माहिती नव्हती.

          पण आज या उच्च शिक्षण देणाऱ्या शासनाच्या साकोली क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आज या शाळा हायटेक भरारी घेतलेल्या आहेत व येथील शिकणारा विद्यार्थी हा पैशाची नासाडी करून इंग्रजी कॉन्व्हेन्ट सारखा भित्रा व मानसिक तणावाचा नाही तर निर्भिड व स्वाभिमानी विद्यार्थी तयार होतो असे रोखठोकपणे प्रतिपादन केले.

         येथील सर्व स्नेहसंमेलनात भाग घेणा-या १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना मंचावरील अतिथींच्या हस्ते बक्षीसांचा त्यांवर वर्षाव करण्यात आला. सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांनी शालेय सहभोजनाचा मिष्ठान्नांसह आवडीने आनंद घेतला. 

        हे दोन दिवसीय स्नेहसंमेलनात शिक्षकवृंद उमेश भस्मे, आशा वलथरे, पल्लवी लुथडे, पुष्पा देशपांडे, लता इळपाते, योगिनी क्षिरसागर, गणेश पुस्तोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे योगराज मुंगमोडे, उपाध्यक्ष प्रमिला बावणे, सतिश परतेके, आश्विनी सरोजकर, लक्ष्मीकांत वालदे, प्रिती कंगाली, नितेश नंदेश्वर, कैलास कापगते, नौशाद शेख, वेज्ञा शहारे, संगिता वघारे, मनिषा येवले, पोषण आहारचे हिराभाई ठेंगरी, वैशाली ठेंगरी व सर्व माता पालक जनतेने विशेष योगदान आणि सहकार्य केले. कार्यक्रमात संचालन शिक्षक उमेश भस्मे तर आभार शिक्षित पी. ए. लुथडे यांनी मानले.