आय.डी.बी.आय बँक सावली तर्फे जिल्हा परिषद शाळांना जल शुद्धीकरण यंत्र भेट…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

         शिक्षण आणी रोजगार वर्धित व्यवसाय कौशल्यासह शिक्षणाचा प्रचार आणी प्रसार हे उद्देश समोर ठेऊन आय.डी.बी.आय बँक शाखा सावलीच्या वतीने सी.एस.आर फंडातून जिल्हा परिषद शाळा सावली,बोथली हिरापूर, विरखल व निफंद्रा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रत्येकी एक संच देण्यात आला.

       सदर निधी आय.डी.बी.आय बँकचे क्षेत्रीय अधिकारी वर्धा क्षेत्र श्री.नवीणजी यादव यांच्या सहकार्यातून उपलब्ध करून देण्यात आला.

       यावेळी सावली आय.डी.बी.आय बँक शाखाप्रमुख श्री.प्रवीण शंभरकर,उपशाखा प्रमुख श्री.निखिलेश पानतावणे,व्यवसाय प्रतिनिधी श्री.राहुल लोडेलीवार,श्री.रोशन मराठे,श्री.मोतीराम नागापुरे,मुख्याधापक आदरलावर सर,मुख्याधापिका मोहुर्ले मॅडम,मुख्याधापक दुर्गे सर प्रमुख्याने उपस्थित होते.