
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
आज गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०२५ ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७७ व्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात त्यांचा प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शांतता आणि अहिंसा आचरणात आणण्यासाठी मनावर प्रभाव टाकण्यासाठी महात्मा गांधी देशभरात ओळखले जातात. त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, खिलाफत चळवळ, भारत छोडो आंदोलन आणि चंपारण सत्याग्रह यासह भारतातील अनेक स्वातंत्र्य चळवळींचे नेतृत्व केले आणि योगदान दिले.
याच दिवशी 1948 साली नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. गांधीजींच्या स्मरणार्थ, भारतात 30 जानेवारी हा दिवस ‘शहीद दिन’ म्हणून ओळखला जातो.शहीदांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण आणि चिंतन करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी व शहिद दिनानिमित्त काँग्रेस कार्यालयात त्यांचा प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,नगरसेवक सचिन संगीडवार,युवा पदाधिकारी प्रवीण सुरमवार,पंकज सुरमवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, स्वच्छतादुत परेश तावाडे,कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते.