
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
स्थानिक राणी यशोधरा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २६ जानेवारी , ७६ वा प्रजासत्ताक दिना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सावली शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शहरातील नागरिकांचा स्वागत सोहळा घेण्यात आला.
२७ जानेवारी ला शाळेचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला.मुला-मुलींनी एकल नृत्य, समुह नृत्य, नाटिका इ.चे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.सावली शहरातील प्रसिद्ध स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा शाल श्रीफळ व बुके सौ.लता लाकडे, नगराध्यक्षा नगरपंचायत सावली यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर ए.आर. दुधे सर, संस्थाध्यक्ष,के.एन.बोरकर, बी. के. गोवर्धन,मा.विलासजी यासलवार माजी नगराध्यक्ष, सुधाकरजी गाडेवार तथा पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.