मधुकर मुंगले यांच्या नेतृत्वात भिसी न.प‌.मुख्याधिकाऱ्यांना विविध समस्या बाबत दिले निवेदन‌.‌‌..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        मौजा भिसी येथील नागरिक विविध समस्यातंर्गत त्रस्त असून त्यांच्या महत्त्वपूर्ण समस्यांकडे जातीने लक्ष देत त्या तात्काळ निकाली काढण्यासंबंधाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका उपाध्यक्ष मधुकर मुंगले यांच्या नेतृत्वात भिसी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

*****

समस्या खालील प्रमाणे..‌

    १) पाणी पुरवठा कर भिसी नागरिकांकडून वर्षभराचा घेत असतांना त्यांना ६ महीणे पण पाणी पुरवठा बरोबर होत नाही.

     2) N.A.T.P. प्लाॅटवर पक्के घर आहेत,तिथे नाली व रस्ते यांची सुविधा नाही..‌

     ३) गावात लावलेल्या पाण्याची टाकी (सिनटॅक्स) सात वर्षांपूर्वी बांधल्या असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

     ४) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या अटी व शर्थीमध्ये शिथिलता करुन बेघर वासियांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.

    ५) नगर पंचायत कार्यालय मध्ये झालेली भरती नियमबाह्य असून नव्याने पात्रतेनुसार व नियमानुसार भरती करण्यात यावी.

    आणि इतर महत्त्वाच्या मागण्याचा निवेदात समावेश आहे.

        राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका उपाध्यक्ष श्री.मधूकर मुंगले यांच्या नेतृत्वात निवेदन देतावेळेस भिसी शहर अध्यक्ष श्री.शुभम गिरडे,जेष्ठ नेते श्री.ललीत डुकरे,जेष्ठ नेते नाना नंदनवार,श्री.मनोज दिघोरे,श्री.अमोल मुंगले,श्री.केशव शिवरकर,श्री.रामदास चौधरी,श्री.राहुल दिघोरे,श्री.आर्यमन नगराळे,श्री.अजय मोहिणकर,श्री.प्रणय खवसे,श्री.विकास रामटेके,श्री.दिपक ठोंबरे,आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.