‘ॲग्रिस्टॅक’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी :- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे शेतकऱ्यांना आवाहन…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली, :- ॲग्रिस्टॅक (Agristack) Digital Public Infrastructure. For Agriculture) योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निर्मिती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id) तयार करण्याची कार्यवाही गडचिरोली जिल्हयात ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून शेतकरी माहिती संच (Farmer Registry) तयार करण्यात येणार असून शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id) तयार करण्यात येणार आहेत.

           सदर ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता (c-kyc) राहणार नाही.

         ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल, फार्मर आयडी बनवला नाही तर पिक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पिक अनुदान यांचा लाभ घेता येणार नाही.

          फार्मर आयडी बनवण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

         आधार कार्ड, मोबाईल क्रमांक जो आधारला लिंक केला असेल, मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असावा.

सातबारा / नमुना ८

           वरील कागदपत्रे घेवून नोंदणी आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे करावी असे आवाहन जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा, यांचे वतीने करण्यात आले आहे.