तिसरे फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.सुकुमार कांबळे…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने तिसरे फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

       या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. सुकुमार कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनांचे याआधीचे यशस्वी अनुभव यावेळीही प्रेरणादायी ठरणार आहेत. 

              पहिले फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन सप्टेंबर २०२३ मध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते.दुसरे संमेलन १ जानेवारी २०२४ रोजी उपराकार लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते,तर पहिले फुले-शाहू-आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन बँकॉक (थायलंड) येथे ७ जानेवारी २०२५ रोजी डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

     तिसऱ्या फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते होणार आहे.

       प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्रीधर नांदेडकर व विलास शिंदगीकर यांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी ‘भारतीय संविधान व वर्तमान संदर्भ’ या परिसंवादाचे अध्यक्षस्थान अँड. विष्णू ढोबळे भूषविणार आहेत,तर ‘परिवर्तनवादी साहित्य,भाषा,आणि संस्कृती’ या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश मोगले असतील.

     या संमेलनात ‘रमाई’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण सिनेअभिनेत्री प्रतिभा आहेर करणार आहेत.

      आंबेडकरी जलशाचे खास सादरीकरणही या वेळी होईल. कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ. प्रतिभा अहिरे भूषवतील.

          संमेलनाच्या समारोप सत्रात डॉ.वासुदेव म लाटे यांच्या हस्ते लाला चव्हाण व कमलाकर गंगावणे यांचा सन्मान करण्यात येईल.प्रमुख उपस्थिती डॉ.दासू वैद्य व बापूसाहेब सोनवणे यांची असेल. 

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.मोहन सौंदर्य यांनी ही माहिती दिली. 

           संमेलनासाठी मार्गदर्शक समितीमध्ये डॉ.ऋषीकेश कांबळे,डॉ. युवराज धबडगे,डॉ. बाळासाहेब लिहिणार,डॉ.मिलिंद वाव्हळे,डॉ.शिवाजी डोळसे,डॉ. सुधाकर नवसागर,डॉ.राहुल म्हस्के,डॉ.प्रशांत वनंजे,डॉ.रेखा वाघ,डॉ.अरुण कोळी,डॉ.योगिता देवगिरीकर,डॉ.दिलीप वाघ,डॉ.मधुकर वाकळे,डॉ.वाय.ई.भालेराव,डॉ. प्रकाश सुरवसे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग आहे.

        तिसरे फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन परिवर्तनवादी साहित्य आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांचे व्यासपीठ ठरणार आहे.