कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- ग्राम पंचायत नयाकुंड मध्ये माझी वसुंधरा अभियानातंर्गत जनजागृती करण्याकरिता महिला मेळावा घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी सुभाष जाधव होते,तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी श्री. वाघ,श्री.लिखार,समन्वयक मुनेश दुपारे,ग्राम पंचायत गुंढरी वाढेच्या सरपंच उज्जवला वाढे, व गुंढरी वाढेच्या माजी सरपंच सुनिता चौहान हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तालुक्यातील मौजा नयाकुंड ग्रामपंचायत सभागृहात गावातील महिला बचत गटाच्या महिला पदधिकारी तथा सभासद आणि गावातील इतर महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती.२०० च्या वर महिला मेळावा कार्यकमात उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन ग्राम पंचायत नयाकुंडचे माजी सरपच नेहा अवस्थी यांनी केले.कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रा. प.अधिकारी प्रियंका बोरकर यांनी प्रस्तावना केली.
तसेच कार्यक्रमाचं अध्यक्ष सुभाष जाधव गटविकास अधिकारी पचायत समीती पारशिवनी यांनी महिला मेळावातंर्गत उपस्थित महिलाना संबोधित करून उचित मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्व मान्यवराचे तथा सभा अध्यक्षांचे सरंपच सुधिर अवस्थी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात नयाकुंड ग्रामपंचायत सदस्य अनिताताई ठाकरे,कांचन कुंभरे,राधिकाबाई कुथे,लिलाधर गायकवाड,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यासह कर्मचारी युगात रामटेके,ऋषिकेश नेवारे,कोमल कावळे,प्रज्जवल निबोंने,नितेश मेश्राम,कुणाल पाटील यांची उपस्थिती होती.