
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे ७ दिवसीय रासेयो विषेश श्रम संस्कार शिबीर मौजा सातारा ता.चिमुर येथे घेण्यात आले.
त्यात चंदु पाटील मारकवार यांनी शिबीर स्थळी मार्गदर्शन केल्यामुळे निश्चितच सातारा गाव महाराष्ट्रात आदर्श गाव पुरस्कारात प्रथम क्रमांकावर येईल.तसेच शिबीरामुळे आम्हाला चांगल्या गोष्टी शिकावयास मिळाल्या,”सुंदर विद्यार्थी अतिशिस्तप्रिय विद्यार्थी,व सातारा हे गाव अतिशय स्वच्छ व सुसज्य इमारतीने व वनराईन घेरलेले आहे.
घर तिथे रस्ता असुन गावात एकोपा नांदत आहे.खेडे समृद्धी करीता शेतीसोबत उद्योग असावे असे सरपंच गजानन गुडधे बोलले.
संस्था अध्यक्ष डॉ. केदारसिंगजी रोटेले यांनी समारोपीय मार्गदर्शनात सांगीतले गावात पाय ठेवताच रौनक वाटली गावाची रचना व भौगोलिक स्थिती सरपंच गुळधे च्या नेतृत्वात उभारीत आहे.
आपली कामे बाजुला ठेवुन मजबुतीने एकसंघाने काम करणे ही बाब ग्राम विकासाच्या दृष्टीने अत्यंत सुखदायक आहे.
निसर्गरम्य वातावरण असल्याने सदरचे सातारा गाव ३ वर्षासाठी दत्तक घेत आहोत.संस्था उपाध्यक्ष अमोलजी रोटेले हे बोलले की,शिबीरास खुप साऱ्या सुविधा गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिल्यात. विद्यार्थ्यांचा काय अॅक्शन प्लॅन आहे.
हगावासाठी काय अॅक्शन प्लॅन विद्यार्थ्यांनी दिला आमचे विद्यार्थ्यांनी गुड लिडर शिप,स्वच्छता,एकात्मता,शिस्तबध्दता,वृक्ष नियोजन, वनराई सामुहिक भावना ह्या गोष्टी शिकल्यात समाजकार्याचा विद्यार्थी सेल्प मॅनेजमेंट शिकवितो.
प्राचार्य डॉ.शुभांगी लुंगे यांनी आपले मार्गदर्शनात म्हणाले की गावच्या उन्नतीसाठी सगळ्यांनी झिजावे गावावरूनच देशाची प्रगती गनल्या जाते.
रासयो प्रमुख डॉ.राजु कसारे यांनी शिबीराचे समारोपीय मार्गदर्शनात कामाचा अहवाल वाचला.
त्यात उद्घाटन पी.एस.आय.दिप्ती मडकाम यांनी केले,जिल्हा उपरूग्णालय चिमुर येथील चमुने रक्तक्षय तपासणी सिकलसेल व आरोग्य तपासण्या केल्यात.
आपत्ती व्यवस्थापनात डॉ. प्रफुल बन्सोड व प्रा.हेमंत वरघने यांनी मार्गदर्शन केले.सांस्कृतीक कार्यक्रम,हळदी कुंकु पी.आर.ए प्रात्याक्षिक गीताताई लिंगायत व चमुने केले.
“चला गरूड होऊ या,संकल्पनेवर प्रकाशजी उमक समाज शास्त्रज्ञ जिल्हा पाणि व स्वच्छता मिशन जि.प.चंद्रपुर यांनी मार्गदर्शन केले.
दशरथजी कुळमेथे अनु. जमाती जातपळताळणी अधिकारी अमरावती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर ग्रंथमित्र सुभाष शेषकर यांनी लर्नीग सोबत अर्नीग या विषयावर मार्गदर्शन केले.
रमेश चौधरी यांनी मधुमख्खी पालन व रोजगार निर्मीती यावर प्रकाश टाकला.संविधान व युवक यावर योग व व्यायाम यावर अश्या अनेक विषयावर मार्गदर्शन पार पडले.
या मार्गदर्शनात डॉ.विना काकडे,डॉ.रागीनी मोटघरे,डॉ.प्रिती दवे,डॉ.गजानन बन्सोड,शिल्पा गणविर,कु. अर्चना एम. बोन्सुले तालुका अभियान व्यवस्थापन तसेच संस्था अध्यक्ष केदारसिंगजी रोटेले,उपाध्यक्ष अमोलसिंगची रोटेले,प्राचार्य शुभांगी लुंगे,सरपंच गजानन गुळधे,मुख्याध्यापक अभिजीत रोहने,पोलिस पाटिल पुष्पा सावसाकडे,गणेश माळवे, उपसरपंच,ग्रा.प.अ.जितेंद्र गुप्ता,पुष्पा माळवे,आर.एफ.ओ. राऊत,शेषराव जांभुळे,विजयजी घरत,चंदु पाटील मारकवार,रासयो प्रमुख राजु कसारे,डॉ.गजानन बन्सोड,डॉ. सुदर्शन खापर्डे,डॉ.रेवतकर, मिलमिले,खांगार समाज कार्याचे विद्यार्थी ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.गजानन बन्सोड तर आभार कु.आरती नन्नावरे यांनी केले.