
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे सांस्कृतिक महोत्सव २०२५ चे उद्घाटन सप्पंन झाले.
या कार्यकमाचे उदघाटक डॉ.अनिल हिरेखन, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, प्रत्येक व्यक्तीत राजहंस दडलेला असतो. राजहंस ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक महोत्सव हा राजमार्ग असतो.
त्यासाठी ध्येय निश्चित करावे लागेल सोबत परिश्रम व संयम असायला हवा. संघर्षातूनच पुढे यावे लागेल. विद्यार्थ्याशी हितगूज साधताना सांगितले की, गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्याच्या हितासाठी अनेक योजना राबवित आहे वेब प्रोग्रामिंग व वेब डिझायनींगच्या माध्यमातून भावी काळात रोजगार उपलब्ध होईल.
तसेच क्रिडा विभागाची राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ प्रायोजक आहे असे सुतोवाच त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.दिपक यावले यांनी सांगितले की, विदयार्थ्यानी मनात न्युनगंड बाळगू नये. उच्च स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. अतिथी म्हणून मार्गदर्शनात प्राचार्य डॉ दिलीप काकडे, नागपूर यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्याच्या कलागुणास वाव देणारे व्यासपिठ आहे.
प्रत्येक विदयार्थ्यानी स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. यश मिळविण्यासाठी शार्टकट नसावा सातत्य असावे असे सांगितले. प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी महाविद्यालयाचा यशस्वी आलेख सांगितला. विविध विभागाच्या यशस्वी विद्यार्थ्यानी महाविद्यालयास यश प्राप्त करून दिले हे विशद करून सांस्कृतिक महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
गांधी सेवा शिक्षण समितीचे प्रा.विनायकराव कापसे, प्रा.मारोतराव भोयर, श्री.कुंदन बारापात्रे श्री.सय्यद निसार सय्यद उपस्थित होते. प्रास्तविक सांस्कृतिक महोत्सव -२०२५ प्रभारी डॉ. प्रफुल राजुरवाडे यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. नितिन कतोजवार तरआभार प्रा निलीमा तुरानकर यांनी मानले. प्रसंगी प्रोफेसर पदी स्थाननिश्चिती झाल्याबदल डॉ. प्रफुल्ल बन्सोड, डॉ. कार्तिक पाटील डॉ.हरेश गजभिये यांचा सत्कार करण्यात आला.
विविध विभागांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. उद्घाटन समारंभास उपस्थित विद्यार्थ्यानी उंदड प्रतिसाद दिला.