जागृत ग्राहक राजा मूलचे वतीने राबविण्यात येतोय एक अनोखा उपक्रम! –“सामाजिक चिंतन सभा”…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी.‌.

    एखाद्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करायची असेल तर त्यात जनसहभाग आवश्यक आहे.मात्र अशी कितीही मिन्नतवारी केली तरीही जनतेला ती बाब म्हणजे एकतर गंमत वाटते किंवा यातून काय मिळणार ह्या विचाराने तो ग्रासला असतो त्यामुळे अशा कार्याकडे आपसूकच दूर्लक्ष करणे पसंत करतो परिणामी,मला दूसरे महत्वाचे काम आहे,घरी पाहुणे आले आहेत,तुम्ही पुढे व्हा मी आलोच म्हणत टाळाटाळ करीत असतो.

        ही बाब हेरून,”जागृत ग्राहक राजा,या सामाजिक संघटनेच्या वतीने जिथे ग्राहक तिथे ग्राहक संघटना,हा एक नवीन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात मंगळवार दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी मूल रेल्वेस्थानकावर एका सभेचे आयोजन करुन करण्यात आली,यांचे नाव ठेवले,”सामाजिक चिंतन सभा”…

      या सभेत संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या मार्गाने रेल्वेस्थानकावर पोहोचले आणि एका बाजूला एका बाकावर बसून संघटनविस्तार या विषयावर चर्चा सुरू केली असता रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी, सहप्रवासी यांचे लक्ष वेधले जात होते ,काही यात सहभागी झाले तर काही टाळून पुढे निघून गेले,मात्र पदाधिकारी यांनी एका महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणली तो विषय होता.

      महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना नवीन स्मार्टमिटर लावण्याचा या विषयावर एकेका सदस्यांनी त्यांचे जवळ असलेल्या माहितीची देवाणघेवाण सुरू केली आणि चर्चेअंती स्थानिक वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून या वीजेच्या स्मार्ट मिटर बाबत सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

      या भेटीत वीज वितरण कंपनी नेमकं काय करणार?त्यासाठी त्यांनी काय भूमिका घेतली आहे? यांतून ग्राहक हिताचे काय?नुकसानदायक काय? हे मिटर लागल्याने ग्राहकांना नेमक्या कोणत्या समस्या उद्भवणार ? नफा नुकसान काय होणार? याबाबत विचारविनिमय करून महामंडळाची भुमिका समजून घेणे शक्य होईल? हा विचार पुढे आला आणि त्यानुसार माहिती आणि वास्तविकता यांचा मेळ घालून पुढिल मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा विषय चर्चेला आला असताना या चर्चेत सहभागी होत जवळपास असणाऱ्या काही प्रवाशांनी आपले मनोगत व्यक्त करताना महामंडळाच्या या तुघलकी निर्णयाचा निषेधही नोंदवला आणि सरकारच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले . 

     आज मोबाईल फोनची जी अवस्था करुन ठेवली आहे तशीच व्यवस्था वीज वितरण कंपनीची होईल आणि वेळीअवेळी एखाद्याच्या घरात अंधार होण्याची शक्यता बोलून दाखवली गेली. 

      समस्या गंभीर होऊ शकते हा विचार पुन्हा पुन्हा चर्चेत येऊ लागल्याने अधिकाऱ्यांशी भेट आणि चर्चा झाल्यावरच काय तो निर्णय घेता येईल या विचाराने सभा संपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यापूर्वी….

   अशाप्रकारे जनतेच्या दरबारात जनतेच्या समस्यांवर चर्चा हा उपक्रम राबविताना डोळ्यासमोर ठेवलेल्या उद्दिष्ट पुर्तीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल होते आणि या चर्चेत स्वयंस्फूर्तीने जनसहभाग लाभला ,त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचले ही आपल्या कार्याची योग्य दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे आणि असेच नवनवीन विषय घेऊन नवनवीन ठिकाणी आपण चर्चा करुन जनमत संग्रहीत करण्यासाठी प्रयत्न करु आणि जनसहभाग मिळविण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण आणि आपली संघटना सदैव प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही दीपक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय प्रबोधनातून दिली.

       जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने मूल रेल्वेस्थानकावर आयोजित,”सामाजिक चिंतन सभेला,दीपक देशपांडे,अशोक मैदमवार उपाध्यक्ष,रमेश डांगरे सचिव,तुळशीराम बांगरे संघटक,डॉ.आनंदराव कुळे, मुक्तेश्वर खोब्रागडे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,सभेचे संचालन रमेश डांगरे यांनी,प्रास्ताविक अशोक मैदमवार यांनी तर आभार प्रदर्शन तुळशीराम बांगरे यांनी केले.