“हाक तुम्हची,साथ आमची…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     काल सायंकाळच्या दरम्यान टायगर ग्रुप भिसीचे सदस्य अवी वाघ हे आंबेनेरी येथे काही कामा निमित्य गेले असता,परत येतांनी आंबेनेरी जवळच अपघात झालेलं बघताच त्यांनी टायगर ग्रुप भिसीचे अध्यक्ष अक्षय नागपुरे यांना माहिती दिली.

     आंबेनेरी येथील काही महिला शेत काम करून घरी परत असतांनी 6.30 चा दरम्यान समोरून येणाऱ्या टुव्हीलरणे महिलांना धडक दिली.

       त्यातील वंदना डांगे नामक महिलेचा पायाला गंभीर दुखापत झाली.टायगर ग्रुपचे सदस्य नारायण सोनवाणे व अमर मदनकर हे घटना स्थळी पोहचून रुग्णाला स्वतःचा गाडीने प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे प्राथमिक उपचार करिता दाखल केले.

   आरोग्य केंद्र येथे टायगर ग्रुपचे अध्यक्ष अक्षय नागपुरे,संदीप शिवरकर,नारायण सोनवाने,अमर मदनकर,अवी वाघ,चिमूर तालुका अध्यक्ष रोहन नन्नावरे उपस्थित होते व रुग्णाला पुढील उपचारकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले.