शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याची उपसरपंच सौ.प्रिती दिडमुठे यांची महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे मागणी… — काही बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी धमकावत असल्याची गंभीर बाब चिंताजनकच! — शब्दाला जागा…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

  शुभम गजभिये 

    विशेष प्रतिनिधी 

      शेतकऱ्यांवर दरवर्षी ओढवणारे नैसर्गिक व कृत्रिम संकट अतिशय गंभीर असून त्यांना सातत्याने मागे नेणारे आहे.

      तद्वतच अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी जगावे कसे,याच विवंचनेत ते नेहमी असतात.

          याचबरोबर बँक व्यवस्थापक कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे पुढे आले आहे आणि शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांच्याकडून पुढे येणारी परिभाषा शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे.

            विधानसभा निवडणूक काळात,”महायुतीच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते.आता महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे.

       शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या परेशानी व विविध समस्या बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र सरकारने कर्ज माफीचा तातडीने निर्णय घेत शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे व त्यांचा सातबारा कोरा करावा अशा प्रकारची मागणी चिमूर तालुक्यातील मौजा साठगाव येथील उपसरपंच सौ.प्रिती प्रविण दिडमुठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

         उपसरपंच सौ.प्रिती प्रविण दिडमुठे यांनी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.

       महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व नापीकीचा मोठ्‌या प्रमाणवर फटका बसत असुन या वर्षी सुध्या निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला आहे. 

       म्हणुन कोणताच शेतकरी बँक मधुन उचल केलेलेले कर्ज परत भरू शकत नाही.”शेतकरी जगेल तर भारत देश जगेल,अशी अपेक्षा उपसरपंच यांची आहे‌.

        म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सरसकट शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा,सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निवेदनात उपसरपंच सौ.प्रिती प्रविण दिडमुठे यांनी नमूद केले आहे.