
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर :-
तपोवन बुद्धविहार,महाप्रज्ञा साधनाभुमी संघारामगिरी येथे २३जानेवारी पासून सतीपठाण कार्यक्रम सुरू असून दि.३० व ३१ जानेवारीला दोन दिवसीय भव्य बौद्ध धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.समारोहासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
भव्य बौद्ध धम्म समारंभाच्या अध्यक्षस्थानी वर्धा जिल्ह्यातील तपोभूमी आंबोडा येथील महस्थाविर भदंत शिलानंद तर प्रमुख अतिथी म्हणून आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तद्वतच मुख्य अतिथी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर,खासदार डॉ.नामदेव किरसान,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस पक्ष राष्ट्रीय ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.सतिष वारजूकर,बौध्द साहित्य अभ्यासक प्रा.रवी कांबळे,डॉ.सहदेव गोसावी नागपूर हे असणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून देश विदेशातील अनेक भिख्खू उपस्थित असणार आहेत.
मुख्य समारंभाची सुरुवात दि.३० ला. सकाळी.१०.०० ला ध्वजारोहनाने होईल.शिलग्रहन सकाळी ११.०० वाजता,भिख्खू संघाचे भोजनदन व धम्म तत्वज्ञानावर प्रवचन होणार आहे.
सायं.४.०० वाजता खासदार चंद्रशेखर आझाद यांचे आगमन व मार्गदर्शन,रात्री ९.००वा बुद्ध रंगभूमी तर्फे मुक्तनाटक व नंतर महापरित्रंपाठ होणार आहे.
दि.३१ ला पहाटे ५.००ते.६.३०वाजता ध्यान साधना व मंगलमैत्री,सकाळी९.००ते ११.०० पर्यंत प्रतीत्यसमूतत्पाद व पट्टानपली विषयावर प्रवचन, भिख्खू संघाला चीवर व अस्टपरिस्कर दान आदी कार्यक्रम होतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व चळवळ,महापरिनिर्वाण आदी विषयांवर तज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
मंगलमैत्री ने समारोप होणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन भिखू संघाचे संघनायक महास्थविर भदंत ज्ञानज्योती करणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भंते धम्मचेती यांनी केले आहे.