
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन आळंदी देवाची व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्यांच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी तसेच जनसामान्यामधील कायद्याविषयक गैरसमज व अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पो.नि.भिमा नरके, संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
वरीष्ठ पो.नि. भिमा नरके यांनी स्वातंत्र्यापूर्वीचा कायदा व स्वातंत्र्यानंतर कायद्यात झालेले नवीन फेरबदल व तरतुदी अंतर्गत महिला सबलीकरण विषयक कायदे व त्यात झालेले फेरबदल, बाल लैंगिक शोषण विरोधात कायदे (पोक्सो), गुड टच-बॅड टच, वेगवेगळ्या गुन्ह्यावर शिक्षेच्या तरतुदी, घटनेनंतर तक्रार नोंदविण्याची पद्धती तसेच जनसामान्यांमध्ये कायद्याविषयी असलेली भीती घालविण्यासाठी आणि कायद्याविषयी असलेले गैरसमज व अज्ञान बाबतीत जनजागृती करण्यात आली.
संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी गेली 70 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विकास कामात आळंदी पोलीस स्टेशनचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.