विस्तार अधिकारी यांनी आश्वासन देऊन सासन बु. उपोषणकर्त्याचे उपोषण सोडले…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

       सासन बु येथे ग्रा पं समोर उपोषणला बसलेल्या उपोषणकर्त्याच्या मागणीचे विस्तार अधिकारी यांनी आश्वासन दिल्यामुळे संबंधित उपोषणकर्त्यांने आपलें उपोषण सोडले.

         उपोषण कर्ता अमोल प्रल्हाद पडघामोड यांनी दि 24 जानेवारीला ग्रा. प.सासन बु समोर उपोषण सुरु केले होते. अगोदर सुद्धा अमोल पडघामोल उपोषणाला बसले होते. परंतु प्रशासनाने त्यांच्या मागण्यांचे आश्वासन दिले नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा उपोषण उपोषण सुरु केले होते.

        तक्रारीमध्ये मुद्दे निहाय चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याबाबत त्याचप्रमाणे ग्रा.प. 2007 ते 2014 पर्यंत नमुना 8(अ )मध्ये खोडतोड करून सरकारी रस्ता खातेदाराच्या नावाने लावणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे.

           कोरडे कुटुंबातील व्यक्तीने सचिवा सोबत संगणमत करून सरकारी शेतीचे रस्त्यावर ग्रा.प.ची कोणतीही परवानगी न घेता पक्के बांधकाम केले असुन अतिक्रमण हटविण्यात यावे आणि स्वतःच्या पैशाने शेळी गोठ्याचे बांधकाम केले असून त्याचे सुद्धा अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नाही अशी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून उपोषण कर्त्याने आक्रमक भूमिका घेतली होती.

          अखेर प्रशासनाला जाग येऊन मिलिंद ठुनुकुले, विस्तार अधिकारी पंचायत विभाग यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समजूत घालून उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला म्हणून असा निर्णय घेणारा अधिकारी मिलिंद ठनुकले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांस आश्वस्त केले उपोषण सोडविले.