ग्रामपंचायत सावरबंध येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- ग्रामपंचायत सावरबंध येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला भारत माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.माधवी भागवत बडवाईक,डॉ.अनिल शेंडे उपसरपंच, देवचंद चांदेवार निलेश बडवाईक ,संदीप रामटेके ,चंदा बडवाईक ,पल्लवी रामटेके ,शोभा खोटेले, वैशाली मेश्राम, उषा मसराम ग्रामपंचायत सदस्य यांनी केले. सरपंच सौ. माधवी भागवत बडवाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

               त्यांनी भारतीय संविधानातील हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. हेमलता योगराज बडवाईक यांच्या शुभहस्ते गांधी चौक सावरबंध येथे ध्वजारोहण केले तंबाखुमुक्तीची शपथ घेतली.

          यावेळी डॉ.नान्हे, कवासे विजया रामटेके नलिनी बडवाईक अंगणवाडी सेविका सौ.मंगला पटोले मुख्याध्यापिका रहांगडाले मॅडम श्री.संजय काशीराम बडवाईक माजी सरपंच, व्यंकट निंबेकर प्रमोद बडवाईक अध्यक्ष शा व्यवअध्यक्ष समिती ,विनेश्वर मडावी, हेमकृष्ण झिंगरे भोजराम बडवाईक ,शिवदास भालेकर राजेश खोटेले अक्षय बडवाईक मोरेश्वर बागडे प्रमोद बागडे व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी,ग्रामवासी उपस्थित होते. गोपाल रामटेके रोजगार सेवक पोमेश्वर मेश्राम परिचर जगन्नाथ झिंगरे यांनी विशेष सहकार्य केले.