शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बि.) गट ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पाडला गेला.या राष्ट्रीय दिनानिमित्त सरपंच लोकनाथ रामटेके यांनी ध्वजारोहण केले.
“गणराज्य,म्हणजे नेमके काय? याबाबत विविध संदर्भ देत सरपंच लोकनाथ रामटेके यांनी नागरिकांच्या मुलभूत अधिकारांसंबंधाने सखोल मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच लोकनाथ रामटेके,ग्रामपंचायत उपसरपंच निखिल डोइजळ,ग्रामपंचायत सावरी(बि) चे सचिव निखिल सहारे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोटघरे,ग्रामपंचायत सदस्य रामदास खामनकर,ग्रामपंचायत सदस्या सुरेखा सेंबेकर,किरण मेश्राम,आवर्जून उपस्थित होते.
याचबरोबर सावरी(बि) तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष विलास वाकडे,जि.प.शाळा सावरी (बि)चे अध्यक्ष घानोडे मॅडम,जि.प.शाळा सावरी(बि) चे मुख्याध्यापक शिनगारे,समाजसेवक बुध्दरत्न शेंडे,अर्चना हनवते,आदीं मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी शाळेतील विद्यार्थी,शिक्षक,अंगणवाडीचे बालक-बालीका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनीं उपस्थित होते.