रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी…
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातंर्गत मौजा नेरी पिएचसी चौकातील रेंगाळलेले उर्वरित अतिक्रमण बुलडोझर चालवुन आज पूर्णतः हटविण्यात आले.
आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतने हाती घेतलेले अतिक्रमण हटविण्याचे काही काम बाकी राहिले होते.ते उर्वरित राहिलेले अतिक्रमण काही कुटुंबानी आडकाठी टाकुन न हटविण्याचा पवित्रा घेतला होता,त्यामुळे ग्रामपंचायतची अतिक्रमण हटाव मोहिम रेंगाळली होती.
त्यानंतर तिन दिवसानी ग्रामपंचायतने अतिक्रमण धारकांना नोटीस देवुनही अतिक्रमण हटविले नाही.तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव व अतिक्रमीत कुटुंब धारकांचा विचार करता मोहिम थांबविण्यात आली होती.
नेरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कायद्याचा व सुरक्षेचा सर्वोतोपरी विचार करून आज दिनांक 27 जानेवारीला सकाळी 9 वाजता नियमानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ केला.
या मोहिमेत ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्राम अधिकारी,सर्व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते.
चिमुरचे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली 12 पि.एस.आय अधिकारी,55 पोलिस कर्मचारी व दंगा नियंत्रण पथक यांच्या उपस्थितीत आणि चोख बंदोबस्तात पिएचसी चौकातील आज पुर्णतः अतिक्रमण हटविण्यात आले.
अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्याच्या सुचना देत दोन बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याच्या मोहीमेला यश आले.
काहीं व्यवसायिकांनी स्वतःच अतिक्रमण काढण्यास धन्यता मानली तर काही दुकानदारांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु पोलिस विभागाच्या सहाय्याने त्यांची समजूत काढून पुर्ण अतिक्रमण काढण्यात आले.अतिक्रमण हटाव मोहिमेत शासकीय कामात ज्यांनी अडथळे निर्माण केले. त्यांना पोलीसांनी डिटेन केले व त्यांचे दुकानातील साहीत्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.